परदेशी चलनाच्या अमिषातून नौदलातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीची फसवणूक

Crime-Scene
Crime-Scene

पुणे - परदेशी चलन खरेदीसाठी नागरिकांकडून पैसे घेऊन त्यांना जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारतीय नौदलातून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याच्या पत्नीची यात ४७ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या प्रकरणात आत्तापर्यंत ३५ ते ४० जणांची फसवणूक झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या गुन्ह्यात अभिजित संजय कुलकर्णी व त्याची पत्नी (दोघेही रा. नारायण पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. पाषाण येथे राहणाऱ्या एका ५३ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. कुलकर्णी दाम्पत्याची वेल्थप्लॅनेट नावाची कंपनी आहे. त्याद्वारे त्यांनी २०१८ पासून नागरिकांना विदेशी चलनाच्या ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविल्यास एका वर्षांत दामदुप्पट देण्याचे आमिष दाखविले होते. 

तक्रारदार शुभांगी यांनी त्यावर विश्वास ठेवत वेल्थ प्लॅनेट कंपनीत ४८ लाख ९२ हजार रुपये गुंतविले. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी कुलकर्णीकडे पैसे मागितले असता, एक लाख ६२ हजारांचा परतावा कंपनीकडून त्यांना देण्यात आला. मात्र उर्वरित ४७ लाख ३० हजार रुपये न देता फसवणूक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल झांजुर्णे करीत आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com