पुण्यात अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना म्हणाली, रेल्वे पास काढून देते अन्...

Fraud With workers under the pretext of removing railway passes in pune
Fraud With workers under the pretext of removing railway passes in pune

 पुणे : परराज्यातील कामगारांना त्यांच्या घरी जाण्यासाठी रेल्वेचा पास काढून देण्याच्या बहाण्याने पैसे उकळणाऱ्या एका महिलेस हडपसर पोलिसानी ताब्यात घेतले. तिने परराज्यातील पाच कामगारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

 पुष्पा विठ्ठल मंदारे (रा. कामधेनु इस्टेट, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याविरोधात राजेशकुमार शामचरण गौतम (वय ४०, रा. चिंतामणी नगर, हडपसर मूळ रा. उत्तरप्रदेश ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारावीचा अभ्यासक्रम बदललाय; असे झाले बदल...

परप्रांतीय मजुराना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी राज्य सरकारकडून सहकार्य केले जात आहे. परंतु, या दरम्यान आरोपी महिलेने हडपसर गाडीतळ तसेच रिक्षा थांबा या ठिकाणी मूळचे परराज्यातील मात्र सध्या पुण्यात राहणाऱ्या मजुरांना भेटून रेल्वेने मूळ गावी जाण्यासाठी पास काढून देऊ, असे बोलून त्यांचा विश्वास संपादित केला. त्यानंतर कामगारांची माहिती फॉर्मवर भरून घेण्याचे नाटक केले. 

पुण्यातल्या शास्त्रज्ञांची आणखी एक भरारी; अवकाशातील दुर्मिळ घटना टिपली!

फिर्यादी, त्यांचे मित्र रोहितकुमार, राजेशकुमार यादव, विजयकुमार आणि त्यांची पत्नी असे एकूण पाच जणांकडून प्रत्येकी एक हजार याप्रमाणे पाच हजार रुपये घेतले आणि कोणालाही पास दिला नाही. त्यामुळे कामगारांनी हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेत फसवणूक करणाऱ्या महिलेबाबत तक्रार केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आर. आर. पाटील करीत आहेत.

कोथरुडकरांची डाळ कधी शिजणार...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com