

online fraud
तळेगाव स्टेशन - व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे केंद्रीय अन्वेषण विभागाचा (सीबीआय) बनावट अधिकारी बनून, कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवून एका ५६ वर्षीय नागरिकाची तब्बल २९ लाख ९९ हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण मावळ परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.