आली रे आली, लाल परी आली...गावाला जायची सोय झाली... 

st
st

बारामती (पुणे) : राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना आपापल्या गावी आता मोफत जाण्याची व्यवस्था राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीने (एसटी) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोमवारपासून (ता. ११) ही सेवा सुरु केली जाणार आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी केलेल्या घोषणेनुसार बारामती आगारातूनही अशा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली. 

राज्याच्या विविध भागातून आलेले व बारामतीत अडकून पडलेल्या विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच प्रवाशांना सोमवारपासून आपापल्या भागात जाता येणार आहे. यातही दोन टप्पे करण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर संबंधित तहसीलदारांची परवानगी घेऊन जाता येईल. मात्र, एका एसटी बसमध्ये २२ प्रवासीच प्रवास करतील. त्यांना मास्क घालणे अनिवार्य असेल. २२ जणांच्या गटाने आपल्या आधारकार्ड क्रमांकासह अर्ज करून विनंती केल्यानंतर तहसीलदार संबंधित आगारप्रमुखांशी समन्वय साधून या गटाला इच्छित स्थळी पाठविण्याची व्यवस्था करतील. 

ज्यांना एकट्याने प्रवास करायचा आहे, त्यांनी सोमवारपासून एसटीच्या वतीने सुरू होणाऱ्या पोर्टलवर माहिती भरुन ठेवायची आहे. यात २२ जणांचा गट पूर्ण झाला, की एसटीच्या वतीने संबंधितांना बस सुटण्याची तारिख, वेळ व ठिकाण कळविले जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागात लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या हजारो प्रवाशांना आपापल्या गावात परतणे सुलभ होणार आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बारामतीहून पुण्याला बस गेल्यानंतर पुण्यात अडकलेल्या बारामतीकरांना ही बस परतीच्या प्रवासात परत घेऊन येईल, अशा पद्धतीने हे कामकाज चालणार असल्याचे अमोल गोंजारी यांनी सांगितले. त्यामुळे विनामूल्य लोक आपल्या इच्छित स्थळी पोहोचू शकतील. याबाबत सविस्तर परिपत्रकाची आम्ही वाट पाहत असून, सूचनेनुसार सोमवारपासून ही सुविधा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात अधिक माहितीसाठी अमोल गोंजारी यांच्याशी 9890255418 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com