
वाल्हे : ‘‘सामाजिक जाणिवेतून ‘सकाळ’ने गेल्या चार वर्षांपासून संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यामध्ये सकाळ सोशल फाउंडेशन, श्री मुकुंद भवन ट्रस्ट पुणे व एच. व्ही. देसाई नेत्र रूग्णालय यांच्या वतीने आरोग्य वारी उपक्रमाअंतर्गत वैष्णवांसाठी राबविलेला नेत्र तपासणीसह चष्मे वाटप उपक्रम कौतुकास्पद आहे,’’ असे प्रतिपादन भाजपचे ओबीसी मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सचिन लंबाते यांनी केले.