मलकापूर महिला मेळाव्यानिमित्त आरोग्य शिबिर

मलकापूर महिला मेळाव्यानिमित्त आरोग्य शिबिर
Published on

मलकापूरला शिबिरात ५३८
महिलांची आराेग्य तपासणी

मलकापूर, ता. ९ : येथील पालिकेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ५३८ महिलांनी सहभाग घेतला. त्यांच्या विविध प्रकारच्या मोफत तपासण्या करून पालिकेने त्यांचा सन्मान केला.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र माळी यांच्या हस्ते शिबिरास प्रारंभ झाला. यावेळी डॉ. विशाल मोहिते, नगराध्यक्ष तेजस सोनावले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, महिला व बालकल्याण सभापती गीतांजली पाटील, उपसभापती गीता साठे, बांधकाम सभापती हणमंतराव जाधव, नियोजन सभापती सूरज शेवाळे, शिक्षण सभापती धनंजय येडगे, मुख्याधिकारी कपिल जगताप, नगरसेविका दीपाली पवार, जोत्स्ना शिंदे, डॉ. स्वाती थोरात, अश्विनी शिंगाडे, रंजना पाचुंदकर, कल्पना रैनाक, सीमा सातपुते, सुनीता पोळ, राजश्री जगताप, मृणालिनी इंगवले, नगरसेवक प्रमोद शिंदे, नितीन काशीद- पाटील, भीमाशंकर माऊर, दादा शिंगण, शरद पवार, सुनील खैरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्यवर्धिनी केंद्र येथे महिलांची आरोग्य तपासणी झाली. शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी, कर्कराेग तपासणी, गरोदरमाता, अस्थिरोग, नेत्र, औषधाेपचार, फिजिओथेरपी या मोफत तपासण्या केल्या. शिबिराचा एकूण ५३८ महिलांनी लाभ घेतला.
.................
चौकट
................

A01365
मलकापूर : मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी डॉ. नरेंद्र माळी. त्या वेळी डॉ. विशाल मोहिते, तेजस सोनावले, मनोहर शिंदे, गीतांजली पाटील, गीता साठे आदी.
...............................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com