

सांगवडच्या आरोग्य शिबिरास प्रतिसाद
कऱ्हाड, ता. ९ ः सांगवड (ता. पाटण) येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून व गांधी फाउंडेशन, कऱ्हाड व सांगवड विविध कार्यकारी सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने, तसेच एच. व्ही. देसाई आय सेंटर कऱ्हाड व ओन्को लाइफ सेंटर सातारा व प्राथमिक आरोग्य केंद्र, मरळी यांच्या वैद्यकीय सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर झाले.
शिबिराचे उद्घाटन सांगवडच्या सरपंच सुमन कोळी यांच्या हस्ते झाले. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, मधुकर सूर्यवंशी, सचिन देसाई, उपसभापती विजय पवार, योगिता गिरी, प्रियांका देसाई, पोलिस उपनिरीक्षक सुनीता शेळके, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता थोरात, सुधाकर देशमुख, पांडुरंग आखाडे, विक्रम खराडे, रामचंद्र कुंभार, अमित सूर्यवंशी, तसेच सर्व संचालक, सेवक वर्ग, पदाधिकारी उपस्थित होते.
शिबिरात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच महिलांसाठी सर्व रोग निदान तपासणी, मधुमेह, रक्तदाब, ईसीजी आदी तपासण्या झाल्या. नेत्र तपासणी करून २०० चष्मे वाटप करण्यात आले. त्यामध्ये ३० रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे आढळले. १८० रुग्णांची मधुमेह, रक्तदाब व ईसीजी, तसेच १२५ महिलांची तपासणी करण्यात आली.
--------------------------------
17528
सांगवड ः येथील आरोग्य शिबिराप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी व अन्य.
-----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.