वडगावात महिलांसाठी 
आज आरोग्य शिबिर

वडगावात महिलांसाठी आज आरोग्य शिबिर

Published on

वडगाव मावळ, ता. ८ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वडगाव नगरपंचायत व विघ्नहर्ता हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव व कातवी शहरातील महिलांसाठी सोमवारी (ता. ९) मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्षा अबोली ढोरे व मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.
वडगाव नगरपंचायत कार्यालयात सोमवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर होईल. यात ईसीजी, हिमोग्लोबिन, किडनी, लिव्हर, बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, एक्स-रे, डोळे, कान, नाक, घसा आदी तपासण्या विनामूल्य होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा अबोली ढोरे यांनी दिली. आरोग्य शिबिरात तपासणीसाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी कॅल्शिअम आणि आयर्न फॉलीक टॅबलेटल्स देण्यात येतील. नागरिकांना शासनाकडून अनेक हितकारक शासकीय योजनांच्या माध्यमातून आरोग्यसुविधा मिळाव्यात म्हणून आयुष्यमान भारत कार्डही काढण्यात येईल. त्यासाठी आधारकार्ड, आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर, चालू असलेले रेशन कार्ड आवश्यक असणार आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता ढोरे यांनी केले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com