

औंध, ता. ३१ : येथील जिल्हा रुग्णालयात जिल्हा प्रारंभिक हस्तक्षेप केंद्राच्या (डीईआयसी) वतीने बालक आणि १८ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींसाठी मोफत हृदयाची सोनोग्राफी (२ डी-इको) तपासणी शिबिर झाले. यात एकूण १२ बालकांची तपासणी झाली असून, त्यापैकी पाच बालके पुढील शस्त्रक्रिया व उपचारांसाठी पात्र ठरली आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज सुगावकर यांनी बालकांची तपासणी केली. हृदयविकार असलेल्या बालकांचे वेळेत निदान करून त्यांना आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिबिराच्या आयोजनासाठी बालरोग विभागप्रमुख डॉ. सुरेखा चावरिया, बालरोगतज्ज्ञ डॉ. सुचित्रा खेडकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. संध्या सिसोदिया, व्यवस्थापक डॉ. मीनाक्षी हबळे, सूर्यकांत शिळे यांच्यासह डीईआयसी विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.
दर महिन्याला राबविणार उपक्रम
जिल्हा रुग्णालय, औंध येथील डीईआयसी विभागातर्फे यापुढे दर महिन्याला ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक व मुलांसाठी दोन वेळा मोफत २ डी-इको तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच गरजू बालकांना व मुला-मुलींना हृदयविकाराचे निदान आणि पुढील उपचार मिळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास डॉ. देवमाने यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.