

PMC deployed medical teams, ambulances and health booths to ensure uninterrupted healthcare services for Warkaris throughout the pilgrimage.
Sakal
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे गुरुवारी (ता. ९) शहरात आगमन झाले. या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे राबविण्यात आलेल्या मोहिमेत गेल्या तीन दिवसांत पालख्यांचे प्रस्थान होईपर्यंत ५३ हजार ८१३ वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. वारीच्या काळात वारकऱ्यांना तत्पर आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या.