Lockdown : विद्यार्थ्यांनो, अभ्यासात पडू देऊ नका खंड; करा फ्री ऑनलाईन कोर्स'

E-Class
E-Class
Updated on

मेरीटनेशनकडून इयत्ता सहावी ते बारावीसाठी लाईव्ह क्लासेस
पुणे - कोविड-19 चा उद्रेक आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे भारतातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांवर मोठा परिणाम झाला आहे. या परिस्थितीमध्ये आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेडची (एईएसएल) उपकंपनी मेरीटनेशनच्या वतीने लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये, याकरिता विशेष मोफत लाईव्ह क्लासेसचे आयोजन करण्यात आले आहे.

मेरीटनेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या या लाइव्ह क्लासेसचा माध्यमातून इयत्ता सहावी ते बारावी'च्या विद्यार्थ्यांकरिता संपूर्ण अभ्यास स्त्रोत लॉकडाऊन संपेपर्यंत मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

या बाबत मेरीटनेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन चौहान म्हणाले, "भारतातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन अभ्यासाकरिता ऑनलाइन येत आहेत. लाइव्ह क्लासेसच्या लोकप्रियतेबद्दल सांगायचे झाले तर दरदिवशी हजारो विद्यार्थी ऑनलाईन क्लासेस मध्ये सहभाग नोंदवत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन लर्निंगची संकल्पना प्रचंड आवडली आहे. तसेच टेक प्लॅटफॉर्मवर मोफत लाइव्ह क्लासेसची सोय लॉकडाऊन संपेपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आपापल्या घरात बसून अभ्यास करू शकतील."

या लाईव्ह क्लासेसचा मेरिटनेशनच्या मोफत ऍपवर विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल. तसेच मेरीटनेशनच्या वतीने जेईई/एनईईटी परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लाइव्ह क्लासेसचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. मेरीटनेशनद्वारे घेण्यात येणाऱ्या मोफत लाइव्ह क्लासेसविषयी अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.meritnation.com/liveclass या संकेतस्थळाचा वापर करावा असे आवाहन चौहान यांनी केले.

"आमच्या एईएसएल परिवारात ‘विद्यार्थ्यांना प्राधान्य’ कायम अग्रभागी राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना घरातून शिक्षण पुढे सुरू ठेवायचे आहे, त्यांच्या मदतीसाठी हा पर्याय उत्तम आहे. कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना आमचा टेक प्लॅटफॉर्म शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी उत्तमरित्या कार्य करत आहे."
- आकाश चौधरी, संचालक- एईएसएल

लाईव्ह क्लासेसचे वैशिष्ट्य व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
- संकल्पना समजावून सांगणारे व्हिडियो, ॲनिमेशन
- विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन करणाऱ्या विविध प्रकारच्या चाचण्या आणि स्मार्ट रिपोर्ट्स
- तज्ज्ञांनी उत्तर तयार केलेली 40 लाख प्रश्नांचा समावेश असलेली डेटा बँक उपलब्ध
- सोप्या पद्धतीने संदर्भ घेण्याकरिता साह्यभूत मजकूर आणि डाऊनलोड करता येईल अशा रिविजन नोट्स
- एनसीईआरटी आणि इतर अभ्यासपुस्तकांकरिता पर्याय
- लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांची एक लाख तासांहून अधिक कालावधीच्या लाइव्ह वर्गांना उपस्थिती 
- आतापर्यंत सुमारे दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा लाइव्ह क्लासमध्ये सहभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com