
कोरोनाबाधित मृतांवर 'उम्मत' करतेय मोफत अंत्यसंस्कार
कॅन्टोन्मेंट - कोरोना (Corona) महामारीने मागिल वर्षभरापासून थैमान घातले आहे. कोरोनाबाधिताजवळ कोणी जात नाही. कोरोनाबाधिताचा मृत्यू (Death) झाला तर बापाला अग्नि (Fire) देण्यासाठी मुलगा जवळ जात नाही, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. समाजाची (Society) ही अडचण समजून कोरोना आजाराने (Sickness) मृत झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार (Funeral) करण्यासाठी पुण्यातील उम्मत संस्थेने एक पाऊल पुढे टाकून कार्य सुरू केले आहे. पुणे शहर (Pune City) आणि परिसरातील आतापर्यंत सर्व जाती-धर्मातील सुमारे एक हजार 300 मृतांवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष जावेद खान (Javed Khan) यांनी दिली. (Free ummat coronation on coronary deadbody)
जावेद खान म्हणाले की, वैकुंठ स्मशानभूमीमधील शेड क्र.1मध्ये हिंदू धर्मांतील मृत व्यक्तींवर एकावेळी सातजणांवर, तर धोबीघाट येथील मुक्तीधाम स्मशानभूमीमध्ये पाच मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची सुविधा आहे, तेथे आमच्या संस्थेच्या व्यक्ती असतात. तसेच टिंबर मार्केट, कोरेगाव पार्क, वडगाव-धायरी, सॅलीसबरी पार्क येथे लिंगायत समाजातील मृत झालेल्या व्यक्तींवर दफन विधी केला जात आहे. कात्रज-धायरी परिसरातील वडगाव-धायरी, तर तेलगू भाषिक समाजातील मृतांवर सॅलीसबरी पार्क येथे अंत्यविधी करण्यासाठी आम्ही जातो. तेलगू समाजातील विशिष्ट मंडळीच दफनविधी करतात, तर इतरांकडून मृतांवर हिंदूधर्माप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याची पद्धत आहे. समाजातील सर्व घटकांच्या अडचणीमध्ये त्यांना मदतीचा हात देणे, हीच आमची इच्छा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: दहावीच्या अंतर्गत मुल्यमापनासाठी ‘व्हॉटस्ॲप’चा सर्वाधिक वापर
जावेद खान यांनी उम्मत संस्था स्थापन केली आहे. संस्थेचे अध्यक्ष जावेद खान, सलीम मौला पटेल, हसन रंगरेज, , जीशान कुरेशी, तैसिफ कुरेशी, गणी शेख, शर्फुद्दीन शेख, सर्फराज तांबोळी, आफताब अत्तार, नदीम खान आदी या संस्थेचे पदाधिकारी आहेत. संस्थेच्या माध्यमातून शहरातील बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम करत होतो. मात्र, मागिल वर्षी कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये आम्ही संस्थेची बैठक घेतली. त्यानंतर तत्कालीन आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी अंत्यविधी करण्यासाठी परवानगी दिली. 6 जून 2020 पासून हे अंत्यविधीचे कार्य सुरू ठेवले आहे. प्रत्येक धर्माच्या रितीरीवाजाप्रमाणे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहे. कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका किंवा मृताचे नातेवाईक कळवितात. त्यानंतर पोलिसांकडून एनओसी घेऊन त्यानंतर मृतांवर अंत्यसंस्कार करतो. मागिल दोन महिन्यांपासून अनेक कोरोनाबाधितांचा घरीच मृत्यू होत आहे. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन मृतदेह बॉडीबॅगमध्ये बंदिस्त करून रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीमध्ये स्मशानभूमीमध्ये नेला जातो. तेथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करतो, असे त्यांनी सांगितले.
उम्मत संस्थेच्या माध्यमातून दगडूशेठ हलवाई, दत्त मंदिर, अखिल मंडई मित्रमंडळ अशा अनेक मंदिरांबरोबर रुग्णालये, समाजमंदिरे, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये सॅनिटायझर फवारणी करण्याचे काम करीत आहे. समाज एकसंध राहावा, असा संदेश देण्याचे काम आमची संस्था करीत आहे. राज्यावर नव्हे, तर जगावर कोरोनाचे सावट घोंगावत आहे. प्रत्येक ठिकाणी शासकीय मदत मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून संस्थेच्या माध्यमातून आम्ही काम करीत आहोत, ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. कारण अनेक मंडळी ही कामे करण्यासाठी अडवून पैसे घेतात. त्यामुळे आम्ही या कामात सहभाग घेतला आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
Web Title: Free Ummat Coronation On Coronary
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..