esakal | मानसिक आरोग्यासाठी उद्या मोफत वेबिनार
sakal

बोलून बातमी शोधा

We are in this together

मानसिक आरोग्यासाठी उद्या मोफत वेबिनार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या (Sakal Social Foundation) वतीने we are in this together या मोहिमेअंतर्गत शनिवारी (ता. ८) सायंकाळी सहाला मुंबई येथील विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने ‘मानसिक आरोग्यासाठी - विपश्यना ध्यान साधना’ या विषयी डॉ. निखिल मेहता, डॉ. मेलविन सिल्वा व डॉ. सविता गायकवाड यांचे मोफत वेबिनार (Free webinar) आयोजित केले आहे. (Free webinar tomorrow for mental health)

मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी ‘सकाळ सोबत बोलूया’ या हेल्पलाईनशी निगडित विविध क्षेत्रातील विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांचे ऑनलाइन मार्गदर्शनपर वेबिनारचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून हे वेबिनार आहे. डॉ. निखिल मेहता हे मुंबई येथील विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूटचे विश्वस्त आणि विपश्यना मेडिटेशनचे शिक्षक आहेत. डॉ. मेलविन सिल्वा हे मानसोपचारतज्ज्ञ असून , बंगळूर येथील निमहॅन्स संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक व लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ सायकायट्रिस्ट्सचे सदस्य आहेत. डॉ. सविता गायकवाड या सल्लागार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.

कोरोनामुळे अनेक चिंता सतावत आहेत, काहींना निराशेने घेरले आहे. मात्र, अशा परिस्थितीतही अनेकजण मनाने खंबीर राहतात. तोच कित्ता अनेकांनी गिरवला पाहिजे. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी शारीरिक व्यायाम आवश्यक आहे. तसेच मनाला मजबूत करण्यासाठी मनाचाही व्यायाम आवश्यक आहे. त्यासाठी विपश्यना ध्यान साधना महत्त्वाची असते.

हेही वाचा: Pune Corona Update: नव्या रुग्णसंख्येइतक्याच रुग्णांना डिस्चार्ज

असे व्हा सहभागी

वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेली लिंक किंवा QR कोड ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या मेल आयडीवर झूम लिंक , मीटिंग आयडी व पासवर्ड मिळेल.

लिंक : www.waitt.in/register-now/

खालील बाबींवर मार्गदर्शन होईल

  • विपश्यना व मेडिटेशन म्हणजे काय ? तसेच विपश्यनाचे काय फायदे आहेत.

  • विपश्यना आपल्या इच्छा व आकांक्षावर नियंत्रण ठेवण्यास कशा प्रकारे मदत करते.

  • दैनंदिन जीवनात विपश्यनाच्या कोणत्या सोप्या पद्धती वापरू शकतो.

  • विपश्यना व ध्यान साधना मनातील भीती, चिंता, नैराश्य व व्यसनाधीनता दूर करण्यास कशा प्रकारे मदत करते.

  • तसेच विपश्यना व ध्यान साधना आणि मानसिक आरोग्य याविषयी विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात येईल.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा