Pune Corona Update: नव्या रुग्णसंख्येइतक्याच रुग्णांना डिस्चार्ज

Pune Corona Update: नव्या रुग्णसंख्येइतक्याच रुग्णांना डिस्चार्ज

पुणे : पुण्यात आज दिवसभरात २,९०२ नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह पुण्यातील आजवरची एकूण रुग्णसंख्या ही ४,३९,२५१ वर पोहोचली आहे. पुण्यात आज एकूण २,९८६ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह पुण्यातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही ३,९२,४८५ वर पोहोचली आहे. पुण्यात सध्या ३९,५८२ ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या आहे.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ७ हजार १८४ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ३९ हजार ५८२ रुग्णांपैकी १,४१४ रुग्ण गंभीर तर ६,५७१ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात १८ हजार ८६२ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २२ लाख २९ हजार १०० इतकी झाली आहे.

Pune Corona Update: नव्या रुग्णसंख्येइतक्याच रुग्णांना डिस्चार्ज
कृष्ण प्रकाश यांना 'खाकी'चा असाही अनुभव

शहरातील २ हजार ९८६ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ३ लाख ९२ हजार ४८५ झाली आहे. पुणे शहरात आज नव्याने २ हजार ९०२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ३९ हजार २५१ इतकी झाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या रुग्णांनी चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर जवळपास 4 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 4 लाख 12 हजार 262 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 3,980 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एका दिवसातील ही सर्वात मोठी वाढ आणि मृत्यू आहे. याआधी 30 एप्रिल रोजी 4 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com