Pune News : पुणे महापालिका बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी

पुणे महापालिकेचे महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी पुन्हा एकदा देण्यात आली आहे.
pune municipal corporation
pune municipal corporationSakal
Updated on: 

पुणे - पुणे महापालिकेचे महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी पुन्हा एकदा देण्यात आली आहे. खलिस्तान नॅशनल आर्मीच्या नावाने ई-मेल पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. सलग तिसऱ्यांदा हा ई-मेल आला असून, यामुळे महापालिकेतील यंत्रणा अधिक सतर्क झालेली आहे. दरम्यान पोलिसांनी श्‍वान पथकासह महापालिकेत तपासणी केली, त्यात धोकादायक वस्तू आढळून आलेली नाही.

Loading content, please wait...