Pune News : मैत्री असावी तर अशी....

आंब्याची झाडे भेट म्हणून देण्यात आली आणि खऱ्या अर्थाने मैत्री निभावली
Pune News :
Pune News : esakal

निरगुडसर : २४ वर्षापूर्वीचा आपला सवंगडी आपल्याला सोडून गेला ही भावना मनात ठेवून निरगुडसर (ता.आंबेगाव)येथील पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालयातील १९९९- २००० इयत्ता १० वीच्या माजी विद्यार्थ्यांनी एक दिलासा दायक आणि प्रेरणादायक उपक्रम राबवला आहे,२४ वर्षापूर्वीचा त्यांच्याच वर्गातील कै.निलेश अनंथा खिलारी यांच्या स्मरणार्थ निलेशच्या कुटुंबाला ५१ हजार रुपये, घरगुती उपयोगासाठी आवश्यक लागणारे साहित्य देण्यात आले, त्यानंतर आंब्याची झाडे भेट म्हणून देण्यात आली आणि खऱ्या अर्थाने मैत्री निभावली.

Pune News :
Mumbai Crime News : आईच्या कुशीतून सहा महिन्यांच्या चिमुरड्याचं अपहरण; पोलिसांकडून १२ तासात मुलाची सुखरूप सुटका

निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालयातील २४ वर्षांपूर्वीचे मित्र व मैत्रिणींचे नुकतेच स्नेह संमेलन एकलहरे(मंचर) याठिकाणी पार पडले त्यावेळी वर्ग मित्र निलेश खिलारी याचा मागील दोन तीन वर्षाच्या काळात मृत्यू झाला आणि आई वडिलांना एकुलता एक मुलगा गेला यानुसार त्या कुटुंबाला आधार म्हणून २४ वर्षापूर्वीचा माजी विद्यार्थ्यांनी खिलारी कुटुंबाला मदत करण्याचे ठरवले,त्यानुसार निरगुडसर गावचे युवा उद्योजक माजी विद्यार्थी प्रदिप टाव्हरे यांनी २५ हजार आणि परेश कटारिया यांनी १० हजार यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले.

तसेच इतर मित्र व मैत्रिणींनी त्यात भर टाकून एकूण ५१ हजार रुपयांची मदत देऊन ७ हजार ९०० रुपयांचा किराणा मालाच्या स्वरुपात असे एकूण ५८ हजार ९०० रुपयांची मदत करण्यात आली .त्यानंतर आंब्याची झाडे भेट म्हणून देण्यात आली,यावेळी गणेश गवारी,सागर तापकिर,महेंद्र गवारी,धनंजय थोरात,प्रसाद तापकिर,युवराज खालकर,प्रकाश खिलारी,विशाल वळसे,विठ्ठल टाव्हरे,सुनिल खिलारी,राजु रणपिसे,बाबाजी टाव्हरे,शिल्पा लायगुडे,प्रतिभा गवारी,सुजाता टेमकर हे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com