Vijay Pandit : अपयशातून घडविले खाकीचे नवे शिलेदार! विजय पंडित यांना १३ वेळा अपयश, तरीही ४० जणांना वर्दीचे धडे

पारगाव येथील विजय पंडित या ३३ वर्षीय युवकाचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. गेल्या बारा वर्षांत त्यांनी १३ वेळा पोलिस भरती दिली, परंतु दुर्दैवाने आठ वेळा केवळ एक-दोन गुणांनी त्यांची वर्दी हुकली.
Vijay Pandit

Vijay Pandit

sakal

Updated on

खुटबाव - पारगाव (ता. दौंड) येथील विजय विष्णू पंडित या ३३ वर्षीय युवकाचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. गेल्या बारा वर्षांत त्यांनी १३ वेळा पोलिस भरती दिली, परंतु दुर्दैवाने आठ वेळा केवळ एक-दोन गुणांनी त्यांची वर्दी हुकली. स्वतःचे पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नसले तरी, विजय यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतःच्या अपयशाचे रूपांतर इतरांच्या यशामध्ये करण्याचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com