deepak gaddare and vilas gaddare
sakal
सोमेश्वरनगर - खंडोबाचीवाडी (ता. बारामती) येथील अवघे दहावी शिक्षण झालेल्या दोन भावांनी दुसऱ्यांच्या शेतात शेतमजुरी करत पैशाला पैसा जोडला. ‘सर्जा-राजा’च्या बैलजोडीनेही त्यांना आधार दिला. अमाप कष्टातून त्यांनी दोन एकर बागाईत क्षेत्र खरेदी केले. पंधरा वर्षे ते आधुनिक ऊसशेती होते आता दोन वर्षांपूर्वी वातानुकुलित कुक्कुटपालनासारखा (एसी पोल्ट्री) अत्याधुनिक व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे या शेतमजुरांची गाडी सुसाट धावू लागली आहे.