
Motivation Story
Sakal
कर्वेनगर : दररोज पहाटे अंधारात उठून डोक्यावर पिशवी, हातात वर्तमानपत्रांचे गठ्ठे घेऊन पावसाचा मारा असो किंवा हिवाळ्यातील थंडी असो, आपल्या वाचकांच्या दारी वेळेत वर्तमानपत्र पोचविणे हाच वृत्तपत्र विक्रेत्यांचा उद्देश असतो. त्यांच्यासाठी हे वर्तमानपत्र केवळ कागदाचा गठ्ठा नाही, तर त्यामागे एका कुटुंबाची उपजीविका, त्याग, कष्ट आणि मुलांच्या भविष्यासाठीची स्वप्ने असतात. पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अशाच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कुटुंबांतील दोन मुलींची उच्च शिक्षणासाठी परदेशात निवड झाली आहे. त्यामुळे या वृत्तपत्र विक्रेत्यांनी गाळलेल्या घामाचा सुगंध यशात परावर्तित होताना दिसत आहे.