Sapna Waghmare : आदिवासी समाजातील सपना वाघमारेची दुर्गम पाड्यातून थेट सातासमुद्रापार भरारी

आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या सपना वाघमारे या विद्यार्थिनीने शिक्षणासाठी दुर्गम पाड्यातून थेट सातासमुद्रापार घेतली भरारी.
Sapna Waghmare

Sapna Waghmare

sakal

Updated on: 

हडपसर - येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या सपना राजेश वाघमारे या विद्यार्थिनीने शिक्षणासाठी दुर्गम पाड्यातून थेट सातासमुद्रापार भरारी घेतली आहे. कायद्याच्या पदव्युत्तर (एलएमएम) शिक्षणासाठी तिचा युनायटेड किंगडममधील जागतिक स्तरावरील युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स व क्वीन मेरी युनिव्हर्सिटी या दोन नामांकित विद्यापीठांतील प्रवेश निश्चित झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com