
-सुवर्णा कांचन
उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील सोरतापवाडी गावात शेतकरी बंडूपंत चौधरी यांचे कुटुंब राहते. सोरतापवाडी गावापासून सुमारे सहा किलोमीटरवरील तरडे येथे त्यांची सात एकर वडिलोपार्जित शेती आहे. वडील खंडेराव आणि सरुबाई यांच्या मार्गदर्शनाखाली बंडूपंत हे बंधू नंदकुमार यांच्यासह पूर्णवेळ शेती करतात. बंडूपंत यांचे शिक्षण प्रथम वर्ष (कला शाखा) झाले आहे. शेती बरोबरच त्यांचे संपूर्ण कुटूंब हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.