
विश्रांतवाडी : येथील एका विद्यार्थ्याने काही वर्षांपूर्वी बांधकाम अभियंता होण्याचे शिक्षण घेताना याच क्षेत्रातील आपला व्यवसाय सुरू केला. अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला असताना २००३ मध्ये बांधकामाच्या जागेवर झालेल्या अपघातात त्याला एक पाय गमवावा लागला. सहा महिने उपचारात गेले, त्याचे शिक्षण थांबले आणि अभियंता होण्याचे स्वप्नही भंगले. मात्र असे अपघातग्रस्त जीवन जगताना आयुष्याचे मजले बांधण्यासाठी त्याच्यातील कलेने त्याला साद घालती आणि त्याच्या हातून विघ्नहर्त्याच्या मूर्ती साकारू लागल्या. त्याच्या या मूर्ती घडविण्याच्या कलेचे आता मोठ्या व्यवसायात रूपांतर झाले आहे.