पुण्यातील फळे, भाजीपाला, फुले आणि केळी बाजारात कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

केंद्र सरकारच्या कृषी विधेयक व कामगार विधेयकाच्या विरोधात मार्केट यार्डातील सर्व कामगार संघटनांनी बंद पाळला  या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. फळे, भाजीपाला बाजार, फुलबाजार, केळी बाजारात १०० बंद पाळण्यात आला. तर गुळ-भुसार विभागातील व्यवहार मात्र सुरु होते. मात्र ग्राहक अत्यल्प प्रमाणात होते.

मार्केट यार्ड - केंद्र सरकारच्या कृषी विधेयक व कामगार विधेयकाच्या विरोधात मार्केट यार्डातील सर्व कामगार संघटनांनी बंद पाळला  या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. फळे, भाजीपाला बाजार, फुलबाजार, केळी बाजारात १०० बंद पाळण्यात आला. तर गुळ-भुसार विभागातील व्यवहार मात्र सुरु होते. मात्र ग्राहक अत्यल्प प्रमाणात होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुरुवारी सकाळी बंद दरम्यान मार्केट यार्डातील मुख्य गेट समोर कामगारांनी निदर्शने केली. कामगार युनियनचे अध्यक्ष किसन काळे, सचिव संतोष नांगरे माजी अध्यक्ष संजय साष्टे, भरत शेळके यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाजारात दररोज नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते मात्र बंद असल्यामुळे शुकशुकाट पहायला मिळाला. दररोज शेतकरी, व्यापारी खरेदीदार, कामगार यांच्यामुळे मार्केटयार्डातील फळे भाजीपाला, कांदा बटाटा, फुल बाजारासह केळी बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. बंदमुळे ही उलाढाल ठप्प झाली होती.

'मी स्वतः उमेदवार आहे, असं समजून आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा'; सुप्रिया सुळेंचं आवाहन

केंद्र सरकारने कामगार कायद्यातीलकामगार विरोधी केलेले बदल, शेतकरी विरोधी नवीन कृषी कायदे, तसेच अत्यावश्यक वस्तू कायद्यातील बदल रद्द केले पाहीजेत अशी मागणी प्रमुख मागणी आहे ती मागणी शासनाने मान्य करावी तसेच कामगारांच्या इतर मागण्यांकडेही केंद्र शासनाने लक्ष  देण्याची मागणी संतोष नांगरे यांनी केली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fruits vegetables flowers and bananas Pune strictly closed market