
आघाडी सरकारने वर्षभरात यशस्वी कामगिरी करीत जनतेची मोठी सेवा केली असून मंत्री टोपे आणि अनिल देशमुख यांच्यासारखे मंत्री तर आपल्या उल्लेखनिय कामातून राज्यभर परिचित झाले आहेत.
केसनंद (पुणे) : पुणे पदवीधर निवडणुकीत 'माझा पक्ष, माझी जबाबदारी' या भुमिकेतून काम करून मी स्वतःच उमेदवार आहे, असे समजून आघाडीच्या उमेदवारांना प्राधान्याने विजयी करा, असे आवाहन संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
वाघोली (ता. हवेली) येथे पुणे पदवीधर निवडणुक आघाडीचे उमेदवार अरूण लाड व प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पदाधिकारी मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार अशोक पवार, आमदार संजय जगताप, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, प्रा. जयंतराव आसगावकर, प्रकाश म्हस्के, माणिकराव सातव, रामभाऊ दाभाडे, कमलाकरदादा सातव, बाळासाहेब सातव, वैशाली नागवडे, डॉ. वर्षा शिवले, हेमलता बढे, लोचन शिवले, चंद्रकांत कोलते, शंकर भुमकर, शिवदास उबाळे, प्रदिपभाऊ कंद, राजेंद्र खांदवे आदी उपस्थित होते.
- डिलिव्हरी बॉयने साकारली 'स्वराज्याची राजधानी'; पिंपरीतल्या युवकाचं होतंय कौतुक!
खासदार सुळे पुढे म्हणाल्या, आघाडी सरकारने वर्षभरात यशस्वी कामगिरी करीत जनतेची मोठी सेवा केली असून मंत्री टोपे आणि अनिल देशमुख यांच्यासारखे मंत्री तर आपल्या उल्लेखनिय कामातून राज्यभर परिचित झाले आहेत.
दरम्यान आघाडीचे उमेदवार हे सुशिक्षित, अभ्यासू आणि जनतेचे प्रश्न मांडणारे आहेत. तसेच राष्ट्रवादीचा बालेकील्ला असलेल्या पुणे जिल्हयात
तिन्ही पक्ष सोबत असल्याने प्रचाराचीही गरज नाही. मात्र अतिआत्मविश्वास न बाळगता 'माझा पक्ष, माझी जबाबदारी' या भूमिकेने प्रत्येकाने मी स्वतःच उमेदवार आहे, असे समजून मतदान करा, असे आवाहन सुळे यांनी केले.
सेनेच्या अध्यक्षाला खोकला..
गुरुवारी वाघोली येथील प्रचारसभेला आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे पदाधिकारी अनुपस्थित असल्याने सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता कोणी आले नाही आले तरी मुख्यमंत्री बरोबर असल्याने काळजी करण्याचे कारण नाही, असे सांगत सेनेच्या अध्यक्षाला खोकला असल्यामुळे ते आले नसल्याचेही स्पष्ट केले.
हवेलीतल्या ३९ गावात राष्ट्रवादीची ताकद मोठी असली तरी मतदारापर्यंत पोहोचणे गरजेचे असून संघटनेच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या अशा या निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करा, असे आवाहन गारटकर यांनी केले.
- येथे सर्व कामे विनामूल्य होतात...पोलिस ठाण्यातील पाटी चर्चेचा विषय
आमदार अशोक पवार म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली
महाविकास आघाडीने भक्कमपणे एकजुटीचे बळ दाखवल्यास उत्तुंग यश अवघड नाही. तर आमदार संजय जगताप यांनीही काँग्रेसच्या वतीने मतदारांना आवाहन केले.
राष्ट्रवादीचे शिक्षक मतदार संघाचे जयंत आजगावकर यांनी सत्ताधारी आघाडीची ताकद पाठीशी असल्याने शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले. हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी प्रास्ताविक केले. सरपंच वसुंधरा उबाळे यांनी स्वागत केले. सुत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष रमेश उंद्रे यांनी केले, तर माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे यांनी आभार मानले.
महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार श्री. अरुण लाड, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार श्री. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आज वाघोली, नगर रोड येथे बैठक घेतली. विचारांशी बांधिलकी असणाऱ्या या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित आहे. pic.twitter.com/4yM6umV04l
— Supriya Sule (@supriya_sule) November 26, 2020
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited By: Ashish N. Kadam)