

Big Relief for Aspirants: Maharashtra Expands Sarathi Scholarship for Overseas Studies
sakal
पुणे : मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थे’मार्फत (सारथी) राबविण्यात येणाऱ्या ‘परदेशी शिष्यवृत्ती योजने’मध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, शैक्षणिक शुल्कावरील कमाल मर्यादा हटविण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना पूर्ण अनुदानित (फुल्ली फंडेड) शिष्यवृत्ती ठरणार असून, विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणाचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार आहे.