ससूनसाठी तब्बल 'एवढ्या' कोटींचा निधी मंजूर; उपमुख्यमंत्र्यांनी केली घोषणा!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

कोरोना स्राव नमुना तपासणीसाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीसाठी 8 कोटी 91 लाख रुपयांचा तर यंत्रसामुग्रीसाठी 3 कोटी 53 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पुणे : कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने चाचण्यांची क्षमता वाढविणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने ससून रुग्णालयात चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी 12 कोटी 44 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, असे निर्देशही त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली 'कोरोना' संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. 

- पालकांनो, मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्या, कारण...

पवार म्हणाले, ''कोरोना स्राव नमुना तपासणीसाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीसाठी 8 कोटी 91 लाख रुपयांचा तर यंत्रसामुग्रीसाठी 3 कोटी 53 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय इतर आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी 7 कोटी 15 लाख 81 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून कोरोना 
प्रतिबंधासाठी आवश्यक वैद्यकीय साधन सामुग्रीची खरेदी करता येणार आहे. याशिवाय परिसेविका व अधिपरिचारिकांच्या भरण्यात आलेल्या पदासाठी आवश्यक निधी देण्यात आला आहे.''

- पुणे व्यापारी महासंघाचे शरद पवारांपुढे गाऱ्हाणे; काय केल्या मागण्या?

पवार म्हणाले...
- महापालिका प्रशासनाने स्राव नमुने तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळासांठी मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे.  
- प्रशासनाने रुग्ण संख्या आणि मृत्यूची माहिती अद्ययावत होत असल्याची खात्री करावी.
- रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांची गय केली जाणार नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A fund of Rs 12 crore 44 lakh sanctioned to increase the capacity of corona tests in Sassoon informed Deputy CM Ajit Pawar