esakal | पुणे : कोरोना मृतांवरील, अंत्यसंस्कारांचं बिल कोण देणार?
sakal

बोलून बातमी शोधा

funeral bill dead body of corona victims pmc Standing Committee

कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या १ हजाराच्या पुढे गेली आहे. या मृतांच्या पार्थिवावर धार्मिक परंपरांनुसार अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. कोरोनामुळे मरण पावलेल्या हिंदू धर्मीय नागरिकांच्या पार्थिवावर सध्या येरवडा आणि संगम ब्रिजजवळील कैलास स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

पुणे : कोरोना मृतांवरील, अंत्यसंस्कारांचं बिल कोण देणार?

sakal_logo
By
उमेश शेळके

पुणे : कोरोनामुळे मरण पावलेल्या नागरिकांचे स्मशानभूमीमध्ये दहन करणार्‍या संस्थेच्या कर्मचार्‍यांच्या वेतनाचे सुमारे चार महिन्यांचे ८ लाख ८७ हजार रुपये बील अदा करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. दरम्यान, हेच काम   कुठल्याही मोबदल्याशिवाय मुस्लिम आणि ख्रिश्‍चन संघटना करीत असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाचे उपायुक्त श्रीनिवास कंदुल यांनी दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या १ हजाराच्या पुढे गेली आहे. या मृतांच्या पार्थिवावर धार्मिक परंपरांनुसार अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. कोरोनामुळे मरण पावलेल्या हिंदू धर्मीय नागरिकांच्या पार्थिवावर सध्या येरवडा आणि संगम ब्रिजजवळील कैलास स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडील अंत्यसंस्कार करणार्‍या कर्मचार्‍यांची अपुरी संख्या पाहून २६ मार्चला महापालिकेने स्मशानभूमीमधील अंत्यसंस्काराचे काम अरूण जंगम यांच्या मे. एस.ए. एन्टरप्रायजझेस या संस्थेला दिले आहे. अंत्यसंस्कारासाठी मनुष्यबळ पुरविण्याच्या बदल्यात ३१ जुलैअखेर या संस्थेला ८ लाख ८७ हजार ८३२ रुपये देण्याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्रीनिवास कंदुल यांनी दिली.

माजी खासदार संजय काकडेंनी मेव्हण्याला दिली गोळ्या घालण्याची धमकी

कोरोनामुळे मरण पावलेल्यांचे मुस्लिम आणि ख्रिश्‍चन समाजातील नागरिकांचा दफनविधी करण्याचे काम काही संघटना मोफत करत आहेत. मुस्लिम समाजातील नागरिकांचे दफनविधी करण्याचे काम शिवसेनेचे शहर पदाधिकारी जावेद खान यांची उम्मत फाउडेशन ही संस्था करत आहे. तसेच अंजुम इनामदार यांची मुस्लिम मंच ही संघटना करत आहे. नायडू, येरवडा, कौसरबाग, सॅलसबरी पार्क आणि कात्रज येथील कब्रस्तानमध्ये हे दफनविधी केले जातात. डॅनियल लांडगे, मनीष पाटील आणि राजेश नायर प्रतिनिधीत्व करत असलेल्या तीन वेगवेगळ्या संस्था ख्रिश्‍चन धर्मातील मृतांचे दफन विधी करत असल्याची माहितीही  कंदुल यांनी दिली.
 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

loading image
go to top