

Fursungi-Uruli Devachi Municipal Council Election Ready
Sakal
फुरसुंगी : पहिल्या निवडणुकीसाठी फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी मोजकेच दिवस राहिले असल्याने कामांना वेग आला आहे. उमेदवारांचे अर्ज घेण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारपर्यंत पाच उमेदवारांकडून अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर आहे. १८ नोव्हेंबरला अर्ज पडताळणी करण्यात येणार आहे. माघार घेण्याची मुदत २१ नोव्हेंबर आणि अपील करण्याची अंतिम मुदत २९ नोव्हेंबर आहे. यानंतर २ डिसेंबरला मतदान असून, ३ डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे.