
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(पीएमआरडीए) अंतर्गत असलेल्या गावांना भविष्यात पाण्याचा तुटवडा भासणार आहे. त्यासाठी आतापासून उपाययोजना करावी लागणार आहे. त्यानुसार नुकतीच पीएमआरडीएअंतर्गत सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची (सीईओ) बैठक घेतली. त्यात पाण्याचा, मलनिस्सारण वाहिनी याचा आढावा घेतला. त्यानुसार भविष्यात उपाययोजना कराव्या लागणार असल्याची या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.