samruddhi waman
sakal
खोडद - गडाचीवाडी (ता. जुन्नर) हे समृद्धीचे गाव असून, किल्ले नारायणगडाच्या पायथ्याशी समृद्धीचे घर आहे. समृद्धीची आई अरुणा या मुंबई पोलिस दलात, तर वडील अजित वामन हे भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा सल्लागार म्हणून काम करत आहेत. विशेष म्हणजे, समृद्धी ही टाटा पॉवरमध्ये प्रमुख अभियंता या पदावर नोकरी करत आहे. नोकरी करत असतानाच ती रँक फ्लाइंग ऑफिसरपदासाठी तयारी करत होती.