गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना झालेले सर्पदंश प्रकरण

गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना झालेले सर्पदंश प्रकरण
Published on

मुख्याध्यापक, अधीक्षकांना
‘कारणे दाखवा’ नोटीस
गडचिरोलीतील आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरण
नागपूर, ता. ११ : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना झालेल्या सर्पदंश प्रकरणाचा प्राथमिक चौकशी अहवाल तयार झाला असून तो शासनाला सादर केला जाणार आहे. दरम्यान, या घटनेच्यावेळी मुख्याध्यापक आणि अधीक्षक आश्रमशाळेत गैरहजर असल्याचे समोर आल्याने त्यांनाच ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली, अशी माहिती आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त आरुषी सिंग यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
जपतलाई आश्रमशाळेतील या घटनेनंतर आदिवासी विकास विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे. घटनेची गंभीर दखल घेत अप्पर आयुक्त आरुषी सिंग यांनी चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीचा प्राथमिक अहवाल आज प्राप्त झाला असून, त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या प्राथमिक अहवालानुसार, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी बेडची आवश्यकता असतानाही, संबंधित संस्थाचालकांनी ते पुरवले नसल्याचे उघड झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या अशा बेजबाबदार संस्थाचालकांवरही चौकशीअंती कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच या अनुदानित आश्रमशाळेला नोटीस बजावण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशाराही अप्पर आयुक्त सिंग यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. कर्तव्यात कसूर करणारे मुख्याध्यापक, अधीक्षक आणि सुविधा न पुरवणारे संस्थाचालक यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. असा इशाराही आरुषी सिंग यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com