

Gadima Family Dispute Over Historic Pune Residence
Esakal
गीतरामायणकार, कवी ग दि माडगूळकर यांच्या पंचवटी निवासस्थानावरून त्यांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी गंभीर असे आरोप केले आहेत. पुण्यात शिवाजीनगर इथं असलेलं गदिमांचं पंचवटी निवासस्थान पाडण्यास विरोध केल्यानं नातेवाईकांकडून त्रास दिला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. सोशल मीडियावर सुमित्र यांनी याबाबत पोस्ट लिहिलीय. त्यात म्हटलं की, गदिमांनी हयात असताना असे म्हंटले होते की जोपर्यंत माझे घर पंचवटी आहे तो पर्यंत माझे अस्तित्व या जगात राहील. मात्र गदिमांची पवित्र वास्तू पंचवटी पाडावी/ बिल्डरला विकावी असा दबाव आमच्या घरातील अगदी जवळच्या नातेवाईकांकडून होत आहे.