esakal | पुणे मुंबई महामार्गाचे काम गडकरींनीच केले
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin-Gadkari

पुणे मुंबई महामार्गाचे काम गडकरींनीच केले

sakal_logo
By
विलास काटे ः सकाळ वृत्तसेवा

आळंदी : गडकरी महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात असताना जे काही रस्ते केले रस्त्यांचे देशभरातील जाळे हे त्यांच्याच कल्पनेतून झाले. विधानसभा सभागृहात आल्यापासून पुणे मुंबई रस्ता विकासाबात अनेकदा ऐकले. पण नितिन गडकरी महाराष्ट्र बांधकाम खात्याचे मंत्री झाले आणि त्यांनी मोठ्या हिंमतीने अनेक जणांचा विरोध पत्करून रस्ता पूर्ण केला असल्याचे वक्तव्य विधानसभा माजी अध्यक्ष व आमदार हरिभाऊ बागडे यांनी आळंदीत केले.

पुणे मुंबई एक्सप्रेस वे बाबत अनेकजण श्रेय घेत आहेत. या महामार्गाला नाव देण्यावरूनही अनेकदा वादंग झाले होते. मात्र आता हा रस्ता केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनीच केला असल्याचे श्री. बागडे यांनी सांगितले. सहकार भारतीच्या आळंदीतील महाराष्ट्र प्रदेश अकराव्या त्रैवार्षिक अधिवेशनात शनिवारी(ता.३) श्री. बागडे यांना स्व. अण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्कार केंद्रिय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी श्री. बागडे बोलत होते.

हेही वाचा: शाहरुख खानचा नवीन वर्षातील पहिला व्हिडिओ, दिली आगामी सिनेमाची हिंट

श्री. बागडे म्हणाले, मुंबई पुणे हा महामार्गावरिल रस्ता मोठा करण्याबाबत मी सन १९८५ सालापासून सभागृहात असल्यापासून ऐकत होतो. तत्कालिन विधानपरिषद सभापती जयंतराव टिळक,तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनीही रस्ता करून देण्याबाबत आश्वासन दिली होती. एकदा तर जयंतराव टिळक सकाळी पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी निघाले. त्यांना मुंबईत यायला संध्याकाळ झाली. आणि मग त्यावेळीही श्री. पवार साहेबांनी सांगितले होते, रस्ता लवकरात लवकर मोठा करू.पण तो झालाच नव्हता. मात्र नितिनजी गडकरी ज्यावेळी महाराष्ट्रात बांधकाम खात्याचे मंत्री झाले त्याचवेळी त्यांनी मोठ्या हिंमतीने अनेक जणांचा विरोध पत्करून रस्ता केला.

आणि याच रस्त्यावरून एकदा प्रसिद्ध सिनेअभिनेते अभिताभ बच्चन प्रवास करत होते. रस्त्याबाबत श्री. बच्चन यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, मला लक्षात येईना की मी आपल्या देशातल्या रस्त्यावरून चाललो की परदेशातल्या रस्त्यावरून. इतक्या प्रकारची भावना त्यांनी त्यावेळी गडकरींना प्रत्यक्ष फोनवरून बोलून दाखवली. तुम्ही रस्ता फार चांगला बांधला. तुम्हाला धन्यवाद. यामुळे देशातले रस्ते चांगले करायचे काम श्री. गडकरींनी केली.

नागपूरच्या तरूण भारतमधे नितिनजी गडकरींबाबत खूप माहिती यायची. श्री. गडकरी रोडकरी जसे आहेत तसे तुम्ही रोड होणार का, असे स्फूट लिखाण एकदा तरूण भारतमधे आले होते. मग त्यावरून श्री. गडकरींनी स्वतःचे वजन कमी करून घेतले.

loading image
go to top