esakal | शाहरुख खानचा नवीन वर्षातील पहिला व्हिडिओ, दिली आगामी सिनेमाची हिंट
sakal

बोलून बातमी शोधा

srk

व्हिडिओमध्ये शाहरुखने न्यू इयरच्या शुभेच्छा उशीरा दिल्यामुळे चाहत्यांची माफी मागत आहे.

शाहरुख खानचा नवीन वर्षातील पहिला व्हिडिओ, दिली आगामी सिनेमाची हिंट

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचे चाहते नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याच्याकडून शुभेच्छांची अपेक्षा करत होते मात्र शाहरुखने पहिल्या दिवशी चाहत्यांना शुभेच्छा न देता दुस-या दिवशी दिल्या. शाहरुखने एक व्हिडिओ शेअर करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत हे स्पष्ट केलं की तो या वर्षी मोठ्या पडद्यावर एंट्री करणार आहे. त्याने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी विलंब झाला म्हणून माफी देखील मागितली. मात्र माफी मागण्याआधी त्याला मच्छर आणि माश्यांनी खूप त्रास दिला. सोशल मिडियावर हा व्हिडिओ आता खूप व्हायरल होतोय. 

हे ही वाचा: अक्षय कुमार फोन चार्ज करण्यासाठी शोधत होता चार्जर पॉईंट, मग पाहा काय झालं...

ट्विटरवर शाहरुख खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला माशा आणि मच्छरांचा भिनभिन करत असलेला आवाज येत आहे. ज्यामुळे किंग खान स्वतः वैतागला दिसून आला. व्हिडिओमध्ये शाहरुखने न्यू इयरच्या शुभेच्छा उशीरा दिल्यामुळे चाहत्यांची माफी मागत आहे. शाहरुखने या व्हिडिओमध्ये सांगितलं की त्याची टीम त्याच्यासोबत नव्हती ज्यामुळे त्याला स्वतःला व्हिडिओ बनवावा लागला. 

या व्हिडिओमध्ये शाहरुखने सांगितलं, '२०२० हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी वाईट होतं. मात्र मी हे समजतो की जेव्हा कोणी त्यांच्या आयुष्यात खाली जातो तेव्हा एकच उपाय राहतो तो म्हणजे पुन्हा उठून उभं राहणं. आणखी चांगल बनणं. २०२० जसं पण होतं तो एक भूतकाळ होता आणि २०२१ हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी नक्कीच चांगलं आणि सुंदर असेल.'

व्हिडिओच्या शेवटी शाहरुख खान सांगतो की, 'तुम्हा सगळ्यांना २०२१ मध्ये मोठ्या पडद्यावर भेटेन.' शाहरुखचा हा व्हिडिओ समोर येताच ट्विटरवर ट्रेंड होत आहे. ट्विटरवर त्याच्या 'पठान' या सिनेमाचं नाव ट्रेंड व्हायला लागलं आहे. सोशल मिडियावर अनेकजण त्याच्या या व्हिडिओवर कमेंट्स देत आहेत. 'पठान' या सिनेमात शाहरुखसोबत दीपिका आणि जॉन अब्राहम देखील आहेत.   

shah rukh khan fights flies and mosquitoes as he records new year message for fans  

loading image
go to top