गडकरींच्या ताफ्यात ५० टक्के कपात

गडकरींच्या ताफ्यात 
५० टक्के कपात
Published on

पुणे, ता. १३ ः केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी गुरुवार (ता. १४) आणि शुक्रवारी (ता. १५) पुणे दौऱ्यावर येत असून, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग प्रकल्पाची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान इंधन बचतीसाठी त्यांनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने इंधन वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून गडकरी यांनी हा पुढाकार घेतला आहे. या दौऱ्यात अधिकारी, पत्रकार आणि सुरक्षा रक्षकांसह ते बसने प्रवास करणार आहेत. यामुळे इंधन बचतीचा उद्देश साध्य होईल, सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही आणि वाहतुकीचे नियोजन अधिक सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संदर्भात पुणे, सातारा आणि सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस प्रशासनाला पत्र पाठवले आहे.
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, गुरुवारी सकाळी आठ वाजता पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्ल्यू. मॅरियट हॉटेल येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (पुणे ते फलटण) पाहणीला प्रारंभ होईल. हा दौरा दुपारी तीन वाजेपर्यंत चालेल. दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी सकाळी पावणेसात वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन येथून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या (इंदापूर ते पुणे) पाहणीसाठी गडकरी रवाना होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com