Key member of Gajanan Marne gang arrested by Kothrud Police in Mulshi
Sakal
पुणे
Pune Crime : रूपेश मारणेला नऊ महिन्यांनी अटक, आयटी अभियंता हल्ला प्रकरण; ‘मकोका’अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल
Kothrud Police Arrest Key Member of Marne Gang : कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीचा सक्रिय सदस्य आणि नऊ महिन्यांपासून फरार असलेला रूपेश मारणे याला कोथरूड पोलिसांनी खंडणी आणि हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्याखाली मुळशी तालुक्यातील आंदगाव येथून अटक केली.
पुणे : कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीचा सक्रिय सदस्य रूपेश मारणे याला कोथरूड पोलिसांनी आज पहाटे मुळशी तालुक्यातील आंदगाव येथून एका बंगल्यातून अटक केली. गेल्या नऊ महिन्यांपासून तो फरार होता. त्याच्यावर खंडणी, मारहाण, हत्येचा प्रयत्न आणि संघटित गुन्हेगारी (मकोका) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत.

