दीड दिवसाच्या गणेशमूर्तीचे यंदा ४६ टक्के विसर्जन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीड दिवसाच्या गणपतीचे  विसर्जन करण्यात आले.

दीड दिवसाच्या गणेशमूर्तीचे यंदा ४६ टक्के विसर्जन

मुंबई : गणेशोत्सव काळातील निर्बंध हटवल्यानंतर यंदाच्या वर्षी मोठा उत्साह मुंबईकरांमध्ये दिसून आला. गणपतीचे आगमन मोठ्या जल्लोषात झाले खरे, पण गतवर्षीच्या तुलनेत यंदा गणपती विसर्जनाच्या आकडेवारीत ४६ टक्क्यांची भर पडली आहे. दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनात यंदाच्या वर्षी ही मोठी वाढ दिसून आलेली आहे. यंदाच्या वर्षी ६० हजार ४७३ इतक्या मोठ्या प्रमाणात घरगुती आणि सार्वजनिक गणपती मूर्तींचे विसर्जन झाल्याची आकडेवारी पालिकेकडून जाहीर केली आहे. ही आकडेवारी गतवर्षीच्या तुलनेत १९ हजारांनी वाढलेली आहे.

यंदा कृत्रिमगतवर्षी म्हणजे २०२१ मध्ये दीड दिवसाच्या ४१ हजार २७७ गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. तर यंदाच्या वर्षी मात्र ६० हजारांहून अधिक गणपतींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. या गणेश मूर्तींमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या २८४ मूर्त्यांचा समावेश होता. तर घरगुती गणेशमूर्तींची मोठी वाढ दिसून आली आहे. दीड दिवसाच्या जवळपास ६० हजार ४७३ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर ६७ हरतालिकांचेही विसर्जन यावेळी करण्यात आले. कोणत्याही विघ्नाशिवाय तसेच अप्रिय घटनेशिवाज हे विसर्जन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने झाल्याची माहिती महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली.

गेल्या दोन वर्षात असलेले निर्बंध पाहता यंदा मोठ्या उत्साहात गणपतीचे मुंबईभर आगमन झाले. तसेच गणपती विसर्जनासाठीही मुंबईकरांनी एक चांगल्या शिस्तीचा आदर्श ठेवला असल्याचेही त्यांनी सांगितले. तलावांसाठीही मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. त्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी १७२ मंडळांनी कृत्रिम तलावात विसर्जनाला पसंती दिली आहे. तर घरगुती गणपतींमध्येही मोठ्या प्रमाणात म्हणजे २४ हजार १९६ इतक्या घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले

Web Title: Ganesh Chaturthi 2022 One And A Half Days Compared To Last Year

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..