

पुणे : नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ अन्न मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) गणेशोत्सवात विशेष तपासणी मोहीम राबविणार आहे. ‘एफडीए’ने जिल्ह्यात ११ ऑगस्टपासून आजपर्यंत ३५ अन्न आस्थापनांच्या तपासण्या केल्या आहेत. त्यामध्ये प्रसादासाठी लागणारे कच्चे अन्नपदार्थ व मिठाईचे ६२ नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत. याबाबतचा अहवाल प्राप्त होताच कायद्याप्रमाणे कारवाई करणार आहे.