
पुणे : गणरायाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या इलेक्ट्रिक साहित्याची खरेदी करण्यास नागरिकांनी सुरुवात केली आहे. विविध रंगांचे दिवे, माळा, झुंबराला ग्राहकांची पसंती दिसत असून, यंदा बाजारात नवनवीन साहित्य आल्याने वैविध्यपूर्ण पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यामध्ये बहुरंगी दिव्यांच्या माळा, इलेक्ट्रिक समई, रंगीबेरंगी झुंबर, दिव्यांचे विविध प्रकार, थ्रीडी-टुडी लाइट फुले, स्टार लाइट, ऑप्टिकल लाइट, मेटल लाइट माळा असे साहित्य उपलब्ध आहे.