
पुणे : यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी २०० हून अधिक गणेश मंडळांनी या वर्षीची विसर्जन मिरवणूक सकाळी सात वाजता लक्ष्मी रस्त्यावरून सुरू करण्याची आग्रही मागणी केली आहे. मध्य भागातील गणेश मंडळांच्या बैठकीत मानाचे गणपती, महत्त्वाचे गणपती, पूर्व भागातील गर्दी, प्रमुख रस्त्यांच्या अडचणी, प्रशासनाच्या भूमिकेसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.