
कर्वेनगर : वारजे-माळवाडी पोलिस ठाण्याच्या वतीने वारजे उड्डाणपूल परिसरात दंगल नियंत्रणाचा सराव केला. शहरात आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, ईदसह इतर सणासुदीच्या काळात नागरिकांची गर्दी होते. अशा परिस्थितीत कोणतीही अप्रिय घटना घडू नये आणि नागरिकांच्या सुरक्षेची खात्री व्हावी, यासाठी हा सराव करण्यात आला.