पुणे शहरात मोठ्या प्रमाणात होणारी कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी व वाहन चालकांची गैरसोय टाळली जावी म्हणून गणेशोत्सवाच्या शेवटच्या सात दिवसांत शहरातील चार रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत तर १२ रस्त्यांवर जड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.