
जुनी सांगवी : हिंदूंच्या सण उत्सवाला धार्मिक आध्यात्मिक अधिष्ठानाबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. त्यामागे सात्विक डोळस श्रद्धा आहे. आपले सण उत्सव साजरे करताना त्यात धांगडधिंगा व बिभत्सपणा नको असे आवाहन जुनी सांगवी येथे संत प्रवचक कालिचरण महाराज यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. हिंदवी सोशल वेल्फेअर ट्रस्टच्या गणपती आरतीसाठी मंडळाने त्यांना पाचारण केले होते. हिंदू धर्मीयांनी सण-उत्सव पवित्रतेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन केले.