

गणेशोत्सवात डीजेवर कारवाई करा
पोलिस अधीक्षकांकडे ज्येष्ठ नागरिकांची अर्जाद्वारे मागणी
भुईंज, ता. २५ : आगामी गणेशोत्सव व सार्वजनिक सणांच्या पार्श्वभूमीवर भुईंज पोलिस ठाणे हद्दीत डीजे, तसेच बेकायदेशीर ध्वनिवर्धकांच्या वापरावर बंदी घालून नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांसह माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते अमित सूर्यवंशी यांनी पोलिस अधीक्षकांकडे अर्जाद्वारे केली आहे.
गणेशोत्सव व इतर सार्वजनिक उत्सवांच्या काळात भुईंज परिसरात डीजे व उच्च क्षमतेचे ध्वनिवर्धक मोठ्या आवाजात वाजविले जात असल्याची तक्रार अर्जात करण्यात आली आहे. केवळ आवाज कमी करण्याच्या सूचना न देता, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भुईंज परिसरात रस्त्यालगत अनेक जुने वाडे, मातीच्या इमारती व धोकादायक बांधकामे आहेत. डॉल्बीच्या तीव्र बेसमुळे निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे या वास्तूंना धोका निर्माण होण्याची शक्यता अर्जात व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे उत्सव काळात ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न केवळ आरोग्यापुरता मर्यादित नसून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेशीही संबंधित असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.
वृद्ध, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना त्रास अतितीव्र आवाजामुळे वृद्ध नागरिक, गंभीर रुग्ण, नवजात बालके, तसेच परीक्षा व अभ्यासाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे अर्जात नमूद आहे.
-----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.