
पुणे : रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात असलेले खड्डे दुरुस्तीची गरज आहे. महापालिकेने तातडीने रस्ते दुरुस्तीची कामे सुरू करण्याची गरज आहे. उपनगरे व ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांसाठी गणेशोत्सवाच्या काळात पीएमपी तसेच मेट्रो सेवा रात्रभर सुरू ठेवावी, अशी अपेक्षा गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या बैठकीत केली.