
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीतील सहभागावरून मंडळांमध्ये मतमतांतरे निर्माण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोणतेही मंडळ डावे-उजवे नाही. पुण्याच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. कोणतेही वाद निर्माण न होता, उत्सव शांततेत पार पडावा. त्यासाठी सर्वांनी एकत्रित बसून समन्वयाद्वारे मार्ग काढावा आणि उत्सवाच्या लौकिकामध्ये अधिकाधिक भर घालण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा शहरातील गणेशोत्सव मंडळांनी ‘सकाळ’तर्फे आयोजित बैठकीत रविवारी व्यक्त केली.