Ganesh Festival 2025
Ganesh Festival 2025 Sakal

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुण्यातील बाजारपेठांत उत्साह, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

PuneTraffic : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी बाजारपेठांत नागरिकांची गर्दी वाढल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली.
Published on

पुणे : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने बाजारपेठांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. मात्र आज सलग दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळपासूनच शहरातील बाजारपेठांच्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. बोहरी आळी, रविवार पेठ, इलेक्ट्रॉनिक मार्केट या भागांत प्रामुख्याने कोंडी झाली होती. त्यामुळे दुचाकी चालविणेही अवघड झाले होते. परिणामी अनेकांनी या भागांत वाहने घेऊन जाणे टाळले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com