
एकलव्य प्रतिष्ठान माध्यमातून "बाप्पा आपल्या घरी" हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये नागरिकांना त्यांच्या सोसायटी व कॉलनीमध्ये गणेश मूर्ती खरेदी करता येणार आहे.
घोरपडी : पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे पण वाढत्या संसर्गामुळे हा उत्सव अगदी सध्या पद्धतीने करावा लागणार आहे. बाहेर जावं तर गर्दी मग उत्सव साजरा करायचा कसा असा अनेकांना प्रश्न पडला आहे. यासाठी एकलव्य प्रतिष्ठान माध्यमातून "बाप्पा आपल्या घरी" हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये नागरिकांना त्यांच्या सोसायटी व कॉलनीमध्ये गणेश मूर्ती खरेदी करता येणार आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत मिळेल.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
एकलव्य प्रतिष्ठानने या उपक्रमा अंतर्गत एका टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये विविध गणेश मूर्ती ठेवल्या आहेत. ७० टक्के शाडूच्या मूर्ती सोबत इतर मूर्ती पण आहेत. एक फूट किंवा त्यापेक्षा लहान मूर्ती असल्याने ५० ते ६० मूर्ती टेम्पोमध्ये आकर्षक पद्धतीने ठेवल्या आहेत. यामुळे नागरिकांना आपल्या दारातच गणेश मूर्तीची खरेदी करता येणार आहे. तसेच यावेळी कोरोनाचे सर्व नियमांचे पालन केले जात आहे. यासाठी हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सोबत सामाजिक अंतर जपत मूर्ती पाहण्यास एका वेळी एकच व्यक्तीस टेम्पो मध्ये प्रवेश दिला जात आहे.
देशाचा जलखजिना आता एकाच क्लिक वर
मागील तीन दिवसांपासून वानवडी मध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला असून आतापर्यंत ५० नागरिकांनी मूर्तीची बुकिंग केली आहे. तर काहींनी श्री ची मूर्ती खरेदी केली आहे. बाजारात मिळणाऱ्या मूर्तीच्या किंमती पेक्षा कमी किंमत असल्याने याला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे.
कोरोनाच्या या महामारीमध्ये वानवडी मधील नागरिकांना बाहेर न जाता आपल्या दारात गणेश मूर्ती खरेदी करता यावी म्हणून हा उपक्रम राबविला आहे. सध्या बुकिंग करून गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री ची मूर्ती मोफत घरपोच देणार आहोत. कोरोना पासून बचाव करण्यासाठी गर्दी टाळणे गरजेचे आहे. या उपक्रमामुळे नक्कीच गर्दी टाळणे शक्य होणार आहे.-प्रफुल्ल जांभूळकर, एकलव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष-
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
(Edited by : Sagar Diliprao Shelar)