पुण्यात गणेश जयंतीनिमित्त 'या' रस्त्यावरील वाहतुकीत बदल; पार्किंगची सोय कोठे?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

गणेश जयंतीनिमित्त मंगळवारी शहराच्या मध्यवर्ती भागात भाविकांची गणपती दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतुक पोलिसांनी केले आहे. 

पुणे : गणेश जयंतीनिमित्त मंगळवारी शहराच्या मध्यवर्ती भागात भाविकांची गणपती दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतुक पोलिसांनी केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहराच्या वेगवेगळ्या भागातुन भाविक मोठ्या संख्येने दगडुशेठ गणमती मंदिरासह मध्यवर्ती भागातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात. भाविकांच्या गर्दीमुळे शिवाजी रस्त्यासह लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, महात्मा फुले मंडई, शनिवारवाडा परिसरासह पेठांमध्येही वाहतुक कोंडी होण्याची शक्यीता लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतुकीमध्ये बदल केला आहे. त्यानुसार, स.गो.बर्वे चौकातुन शिवाजी रस्त्याने स्वारगेटला जाणाऱ्या चारचाकी वाहनांसह बस आवश्यआकतेनुसार जंगली महाराज रस्त्यावरुन डेक्कन, टिळक रस्ता मार्गे पुढे जातील. तर महापालिका भवनाकडे जाणाऱ्या वाहनांना जंगली महाराज रस्त्याने झाशीची राणी चौक येथून डावीकडे महापालिका भवनाकडे वळविण्यात येणार आहे. त्यामुळे शिवाजीनगरहून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक शाखेचे अतिरीक्त पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांनी केले आहे. 

हेही वाचा : शिवभोजनालयावर तुफान गर्दी; पोलिस संरक्षणाची मागणी

भाविक व नागरीकांनी नदीपात्रात वाहने लावावीत 
गणपतीचे दर्शन घेण्यासाठी चारचाकी वाहनांमधून येणाऱ्या भाविकांनी तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरीकांनीही त्यांची चारचाकी वाहने शिवाजी रस्त्यावर न आणता नदीपात्रामध्ये पार्कींग करावीत, त्यानंतर इच्छितस्थळी जावे, याबरोबरच वाहतुक व्यवस्थेतील बदलाबाबतच्या सविस्तर माहितीसाठी www.punetrafwatch.com या संकेतस्थळाचा वापर करावा, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh jayanti pune traffic diversion on shivaji road parking