शिवभोजनालयावर तुफान गर्दी; पोलिस संरक्षणाची मागणी 

टीम ई-सकाळ
सोमवार, 27 जानेवारी 2020

पहिल्या दिवशी रविवारी (ता. 26) एक हजार 114 नागरिकांनी; तर दुसऱ्या दिवशी सोमवारी एक हजार 305 शिवभोजन थाळींचा नागरिकांनी आस्वाद घेतला.

पुणे : पुण्यात सुरू झालेल्या शिवभोजन केंद्रावर तुफान गर्दी झाल्यामुळं, पोलिस संरक्षण मागवण्याची वेळ आली आहे. केंद्रावर होणारी गर्दी आटोक्यात कशी आणायची, असा प्रश्न अन्नधान्य वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समोर आहे. दरम्यान, पुण्यातीलच काही केंद्रांवर अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोणत्या केंद्रावर झाली गर्दी 
पुणे शहरात एकूण 11 शिव भोजन केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यातील मंडईतील शिवभोजन केंद्र काही वैयक्तिक कारणांमुळं बंद आहे. इतर दहा केंद्र पूर्णवेळ सुरू आहेत. त्यातील मार्केट यार्ड येथील केंद्रावर मात्र तुफान गर्दी होताना दिसत आहे. पहिल्या दिवशी रविवारी (ता. 26) एक हजार 114 नागरिकांनी; तर दुसऱ्या दिवशी सोमवारी एक हजार 305 शिवभोजन थाळींचा नागरिकांनी आस्वाद घेतला. मार्केट यार्डमधील भोजनालयात सोमवारी तासाभरातच दीडशे थाळ्या संपल्या. पुन्हा नागरिकांची गर्दी झाल्यामुळे पोलिस संरक्षण मागण्याची वेळ अन्नधान्य वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर आली; तर पिंपरी-चिंचवड भागातील अन्य तीन केंद्रांवर योजनेला प्रतिसाद कमी मिळाला.ट

अजित पवारांनी शिवभोजन घेतलं नाही; काय आहे कारण?

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, पिंपरी चिंचवड येथील तीन शिव भोजन केंद्रांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. पीएमआरडीए आकुर्डी रेल्वे स्थानक, वल्लभनगर बस स्थानक आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भोजनालयात नागरिकांचा कमी प्रतिसाद मिळाला, असे अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune shiv bhojan thali market yard huge response